गौरी-गणपती
उत्सवानिमित्त “आनंदाचा शिधा ”
सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक
वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक
तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा
या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी
शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरीता
राज्यात सन २०२२ च्या दिवाळी, सन २०२३ च्या गुढीपाडवा- डॉ.
बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी- गणपती उत्सव व दिवाळी,
सन २०२४ च्या श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा- छ. शिवाजी महाराज
जयंतीनिमित्त प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच "आनंदाचा शिधा ” वितरीत
करण्यात आला आहे. सदर उपक्रमास राज्यात उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
![]() |
गौरी-गणपती उत्सवानिमित्त “आनंदाचा शिधा ” |
त्याच धर्तीवर सन-२०२४ च्या गौरी-गणपती उत्सवानिमित्त "आनंदाचा शिधा" प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे:-
v “आनंदाचा
शिधा” मध्ये समाविष्ट
असलेले शिधाजिन्नस संच (प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच):
ü १ किलो
रवा,
ü १ किलो
चनाडाळ,
ü १ किलो
साखर व
ü १
लिटर सोयाबीन तेल
v वितरीत
करण्यासाठीचा मान्यता कालावधी :
दि. १५
ऑगस्ट, २०२४ ते दि. १५ सप्टेंबर, २०२४ या १
महिन्याच्या कालावधीत ई- पास प्रणालीद्वारे र १००/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने
वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
v “ आनंदाचा
शिधा ” घेण्यासाठी पात्रता
:
राज्यातील
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब
शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व
नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य
रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी अशा एकूण १,७०,८२,०८६ शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा
शिधा ” गौरी-गणपती उत्सवानिमित्त वितरीत
करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
v गौरी-गणपती
उत्सवानिमित्त आलेला शासन निर्णय :
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरीत करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सबंधित प्रसिद्ध झालेले शासन निर्णय 28.06.2024 ते 12.07.2024 दिनांकापर्यंत दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!