मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी बदल झालेल्या पात्रतेच्या अटी आणि लागणारी कागदपत्रे:
महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात
विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे,
ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परीणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या
आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा
करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची
"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण"
योजना सुरू करण्यात आली आहे.
आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे.
मुख्यमंत्री माझी
लाडकी बहीण योजनेच्या सबंधित प्रसिद्ध झालेले शासन निर्णय 28.06.2024 ते 12.07.2024 दिनांकापर्यंत समोर दिलेल्या लिंकवर(तारखेवर)
क्लिक करून डाउनलोड करू शकता.
1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (28.06.2024)
2. योजनेतील सुधारणाबाबत (03.07.2024)
3. योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती
गठीत करण्याबाबत (05.07.2024)
4. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीतकरण्याबाबत (11.07.2024)
5. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत (12.07.2024)
योजनेचे लाभार्थी:-
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील
विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता:-
(1) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
(2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
(3) किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
(4) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
(5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
अपात्रता :-
(1) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित
वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
(2) ज्याच्या कुटुंबातील
सदस्य आयकरदाता आहे.
(3) ज्यांच्या कुटुंबातील
सदस्य नियमित / कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत
सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा
सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत
असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
(4) सदर लाभार्थी महिलेने
शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.1,500/- पेक्षा
जास्त लाभ घेतला असेल.
(5) ज्यांच्या कुटुंबातील
सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
(6) ज्यांच्या कुटुंबातील
सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/ उपक्रमाचे
अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
(7) ज्यांच्या कुटुंबातील
सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
(8) ज्यांच्याकडे चारचाकी
वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:-
1.
आधार कार्ड
2. अधिवास प्रमाणपत्र – 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक.
3. उत्पन्न प्रमाणपत्र – अडीच लाखापर्यंतचा उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड.
4. अर्जदाराचे हमीपत्र – अर्जदाराचे स्वयंघोषणा पत्र, एका कागदावर तुम्ही ते लिहून त्यावर सही व दिनांक टाकून किंवा दिलेला लिंकवर क्लिक करून तुम्ही हमीपत्र डाऊनलोड करून त्यावरील माहिती भरून देऊ शकता. (अर्जदाराचे हमीपत्र)
5. सदर महिलेचे बँक पासबुक
6.
अर्जदाराचा फोटो – कॅमेरा सुरू होईल आणि मग फोटो काढायचा
आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'साठीचे अर्ज
ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं करता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या 'नारीशक्ती दूत' या
मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करता येऊ शकतात.
पण, ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्या महिला अंगणवाडी केंद्रात जाऊन
आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीनं दाखल करू शकतात. नंतर अंगणवाडी सेविका तो अर्ज ऑनलाईन
ॲपद्वारे अपलोड करतील.
अर्ज केल्यानंतर पुढे काय?
अर्ज दाखल केल्यानंतर त्याची छाननी प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर
पात्र अर्जदारांची माहिती प्रसिद्ध केली जाईल.
या योजनेसाठी राज्य आणि जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.
योजनेसाठीचे अंतिम पात्र लाभार्थी ठरवणे आणि योजनेवर देखरेख ठेवण्याचं काम ही
समिती करणार आहे.
अर्ज केल्यानंतर पुढे काय होईल, याविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे अधिवेशनात म्हणाले की, “जो आपला जुना डेटाबेस आहे त्याची माहिती घेऊन
ज्यांचं अडीच लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे, त्यांच्या खात्यात तत्काळ पैसे जमा
करण्यात येईल. पण समजा त्यांचे अर्ज जुलै महिन्याच्या शेवटी आले, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रक्रिया झाली, तर
जुलै-ऑगस्ट दोन्ही महिन्याचे पैसे त्यांना मिळतील.”
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!