WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now
BMC Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक पदासाठी भरती
मा. महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्र. एमजीएफ / एफ / 3604 दि. 24.06.2024 नुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट-क मधील "कार्यकारी सहायक" (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली 1846 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत.
सदर पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रस्तृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
"कार्यकारी सहायक" (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वत: खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता / अटींची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid ) ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
֍ जाहिरात क्र. : एमपीआर/ 7814 दि. 14.08.2024
֍ एकूण : 1846 जागा (बृहन्मुंबई महानगरपालिका)
֍ ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : दि. 20 ऑगस्ट 2024 ते 09 सप्टेंबर 2024
֍ पदाचे नाव आणि पदसंख्या : कार्यकारी सहायक (गट-क) - 1846 जागा
֍ वेतनश्रेणी : स्तर-M15- रु.25,500 - 81,000
֍ शैक्षणिक पात्रता :
i) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण व किमान 45% गुणांसह वाणिज्य,विज्ञान,कला,विधी किंवा तत्सम शाखांमध्ये पदवीधर,
ii) माध्यमिक शालांत प्रमाणपत्रामध्ये मराठी व इंग्रजी विषयाचा समावेश असावा,
iii) इंग्रजी व मराठी टंकालेखानाचे किमान 30 श.प्र.मी. प्रमाणपत्र,
iv) MS-CIT परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा प्रमाणपत्र
֍ वयाची मर्यादा : 18 ते 38 वर्ष 14.08.2024 रोजी (मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट)
֍ नोकरी ठिकाण : मुंबई
֍ अर्जाचे शुल्क : खुला प्रवर्ग : रु. 1000/- व मागासवर्गीय : रु. 900/-
֍ जाहिरातीची अन्य माहिती :
सदर जाहिरात हि 14.08.2024 रोजी MyBMC - (mcgm.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीबद्दल अधिक माहिती जसे परीक्षेची रचना [संपादन], अर्ज कसा करावा, जागा कश्याप्रकारे विभक्त केलेल्या आहेत, परीक्षेसाठीचे सूचना व स्वरूप, रिक्त जागा भरतांना लागणारे दस्ताऐवज व ओळख पळताळणी बद्दल शंकेचे निराकरण करण्यासाठी सोबत जाहिरात दिलेली आहे.
֍ जाहिरात (BMC Bharti Notification) :- सविस्तर BMC/MPR/7814-2024 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
֍ ऑनलाईन अर्ज (Apply Online for BMC Bharti) :- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
֍ अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या प्रक्रियेशी संबंधित पुढील सर्व घोषणा / तपशील फक्त अधिकृत आयबीपीएस वेबसाइट वेळोवेळी https://portal.mcgm.gov.in/ प्रकाशित / प्रदान केले जातील. उमेदवारांनी तपशील आणि अद्यतनांसाठी दिलेल्या अधिकृत वेबसाइटला नियमितपणे भेट द्यावी.
सदर लेख आपल्या मित्रांना शेअर करा. या लेखाबद्दल काही प्रश्न उद्भवल्यास कृपया कमेंट करा.
WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!