"लाडका भाऊ योजना" म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप :-
महाराष्ट्र
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता
व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमांर्तगत तयार
केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून
देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव
प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या
उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) योजनेद्वारे
उपलब्ध करून देण्यात येईल. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे
उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील.
उदिष्ट
:- उमेदवारांना उदयोजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे
रोजगारक्षम करणे.
आर्थिक तरतुद :-
“मुख्यमंत्री
युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरीता रु. 5,500 कोटी (पाच हजार
पाचशे कोटी फक्त) निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
֍
सदर योजनेकरीता उमेदवाराची पात्रता खालिलप्रमाणे
असेल :
1. उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष
असावे.
2. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता
१२वी पास/ आयटीआय/ पदविका / पदवी/ पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले
उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.
3. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी
असावा.
4. उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
5. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न
असावे.
6. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार
नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. (नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा)
֍ सदर योजनेकरीता आस्थापना/ उद्योगासाठीची पात्रता खालिलप्रमाणे असेल :
1. आस्थापना/ उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत
असावा.
2. आस्थापना / उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या
संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
3. आस्थापना/ उद्योगाची स्थापना किमान 3 वर्ष पूर्वीची असावी.
4. आस्थापना/ उद्योगांनी EPF, ESIC,
GST, Certificate of incorporation, DPIT व उद्योग आधार ची नोंदणी
केलेली असावी.
֍ योजनेचे ठळक वैशिष्टे :
· या संकेतस्थळावर बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व
पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू
शकतील.
· विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग / स्टार्टअप्स, विविध आस्थापना इ. यांना
आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवतील.
· सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षण
(इंटर्नशिप) च्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध
होतील.
· सदर कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) चा
कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनामार्फत विद्यावेतन
देण्यात येईल.
· सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक
खात्यात (DBT) जमा करण्यात येईल.
֍ शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनाचे विवरण खालील प्रमाणे असेल :
֍ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शासन निर्णय :
मुख्यमंत्री
युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय डाऊनलोड
करण्याकरिता येथे क्लिक करा.
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!